Press "Enter" to skip to content

नवी मुंबईतील LLM अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळवणारे पहिलं कॉलेज

कमळगौरी हिरु पाटील (KGP) शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज, तळोजे ह्यास LLM अभ्यासक्रमासाठी कायम तत्वावर परवानगी

चेअरमन बबनदादा पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उच्चतंञ शिक्षण मंञ्यांचे आभार !

सिटी बेल लाइव्ह / तळोजा #

नवी मुंबई क्षेत्रात LLM (विधी ३ वर्ष) अभ्यासक्रमासाठी कमळगौरी हिरु पाटील (KGP) शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज, तळोजे ह्यास कायम तत्वावर परवानगी शासनाकडून मिळाली आहे. नवी मुंबईतील अशाप्रकारच्या अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळवणार हे पहिलच कॉलेज ठरलं आहे.

त्याचप्रमाणे संस्थेच्या बी.के.पाटील महाविद्यालयासही एम एस.सी. ऑर्गेनिक केमिस्ट्री अभ्यासक्रमांसाठी कायम तत्वावर परवानगी शासनाकडून मिळाली.

आमची शिक्षण संस्था गेली अनेक वर्षे यथील विद्यार्थ्यांना माफक फी मध्ये चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच प्राधान्याने विचार करून तसेच स्थानिक विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत परवानग्या दिल्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत ह्यांचे मनपूर्वक आभार !
बबनदादा पाटील,
चेअरमन,कमळगौरी हिरु पाटील (KGP) शिक्षण संस्था

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.