सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली #
ऑगस्टमध्ये वेगवेगळ्या सुटय़ांमुळे देशभरातील बँका तब्बल 15 दिवस बंद राहणार आहेत. श्रावण महिना चालू आहे या महिन्यात अनेक सणवारांच्या निमित्ताने सार्वजनिक सुटी असते.
त्यात महिन्याच्या पहिल्याच दिवशी 1 ऑगस्टला बकरीदची सुट्टी आली. 3 ऑगस्टला रक्षाबंधन असून अनेक राज्यांमध्ये या सणाची सुटी देण्यात येते.
त्यानंतर जन्माष्टमी आहे, 8 ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार आणि 9 ऑगस्ट रोजी रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार.
11 ऑगस्ट रोजी श्री कृष्ण जयंती, 12 ऑगस्ट रोजी गोपाळकाला 13 ऑगस्ट रोजी पॅट्रिओटिक डे, तसेच 15 ऑगस्ट दिवशी स्वातंत्र्य दिन असल्याने या सर्व दिवस बँका बंद असतात.
22 ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्ताने अनेक राज्यात बँका बंद राहतात. तर 23 ऑगस्टला रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे.
29 ऑगस्टला झारखंडमध्ये कर्मा पुजेची सुटी आहे. 31 ऑगस्ट रोजी तिरुओणम निमित्ताने बँका बंद असतील.
Be First to Comment