Press "Enter" to skip to content

रेल्वे मंत्रालय सदस्य अभिजित पाटील यांना निवेदन

रसायनी रेल्वेस्टेशन भुयारी मार्गांऐवजी उड्डाणपूल बांधण्याची मागणी

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

कोकण रेल्वे लाईन अंतर्गत मौजे जुनी पोसरी रसायनी रेल्वे स्टेशनजवळ भुयारी मार्गाचे काम चालू केले आहे.सदर कामाचे रस्ता मार्ग हे दक्षिणकडे काढत आहेत असे निदर्शनात आले आहे . परंतु मौजे जुनी पोसरी व ठाकूरवाडी ह्या गावांचा मार्ग उत्तरेकडे असल्याने व सदर गावाची लोकसंख्या जास्त असल्याने तसेच पोसरी गाव तुराडे गाव तसेच ठाकूरवाडी गावची शेत जमीन असल्यामुळे विकासाच्या दृष्टीने मोठी अडचण निर्माण होणार आहे.

सदर नाला याची उंची पेक्षा १० फुट भुयारी मार्ग खाली असल्यामुळे पावसाळी जास्त प्रमाणात पाणी नाल्याने येत असल्यामुळे भुयारी मार्गात १० फुट पाणी राहील त्यामुळे सदर भुयारी मार्गाचा काहीही उपयोग होणार नाही . तसेच शाळेत जाणारी मुले रिक्षा चालविणे आजारी पेशेंट जलद हॉस्पिटल ने-आन करायचे असल्यास मोठी अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच कामावर जाणारे येणारे कामगारांची अडचण होणार आहे .

सदर भुयारी मार्गाला युर्टन असल्यामुळे पुढे येणारी वाहने दिसणार नाही . सदर मार्गालगत दांडमार्गे आपटा रोड असल्याने त्या जागेवर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भुयारी मार्गातून वाहने जात येत असताना अवजड वाहने चड जास्त असल्याने मोठी अडचण होऊ शकतो .

सदर भुयारी मार्ग रद्द करून उड्डाणपूल बांधून मिळावे त्यामुळे ग्रामस्थांचा मार्ग सुरक्षित होईल असा ग्रुप ग्रामपंचायत पोसरी यांच्यावतीने रेल्वे मंत्रालय सदस्य अभिजित पाटील यांना दिला आहे.यावेळी अरविंद पाटील, गणेश थोरवे (जिल्हाध्यक्ष पोलिस सेवा संघटना), ज्ञानेश्वर माळी ( विभागप्रमुख शिवसेना गुळसुंदे ), महादेव देसाई उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.