Press "Enter" to skip to content

गुळसुंदे ग्रामपंचायतीच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

गुळसुंदे – आकुलवाडी रेल्वेफाटक येथे सब – वे पुल बांधण्याची अभिजीत पाटील यांची मागणी

सिटी बेल | पनवेल |

गुळसुंदे – आकुलवाडी रेल्वेफाटक येथे सब – वे पुल बांधण्यात यावा अशी मागणी मध्य रेल्वे चे झेड.आर.यू.सी.सी. सदस्य अभिजीत पाटील यांनी जनरल मॅनेजर मध्य रेल्वे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत अभिजीत पाटील यांनी जनरल मॅनेजर, मध्य रेल्वे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे ता. पनवेल यांनी दिनांक ०१/१०/२०१८ रोजी वरील विषयासंदर्भात अर्ज केला होता परंतु या विषयावर प्रशासनाकडुन लक्ष दिले जात नाही.

तसेच इतर रेल्वेफाटकाचे गेट रेल्वे पास झाल्यानंतर लगेचच २ ते ३ मिनीटात उघडतात. परंतु गुळसुंदे-आकुलवाडी रेल्वेफाटकाचे गेट जवळजवळ २० ते २२ मिनिटे बंद असतो. रेल्वे, पोसरी रेल्वे स्टेशन तसेच आपटा रेल्वे स्टेशन पास झाल्यानंतरच सदर रेल्वेफाटकाचे गेट उघडले जाते त्यामुळे कामावर जाणारे आजारी व्यक्ती / रूग्णवाहीका, गरोदर महिला विद्यार्थी, मोळी विकायला जाणा-या अदिवासी महिला यांना खुप वेळ ताटकळत उभे रहावे लागते. परिणामी कामगारांना वेळेत कामावर हजर होता येत नाही, आजारी व्यक्तीना वेळेवर दवाखान्यात नेता येत नाही. अशा अनेक समस्या निर्माण होतात.

सदर बाबतीत आपण तातडीने लक्ष दयावे व लवकरात लवकर सब-वे पूल बांधण्यात यावा. तसेच सब-वे पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत उपरोक्त रेल्वे फाटक अद्ययावत करून उघडण्याचा वेळ कमीत कमी करावा.

– अभिजीत पांडुरंग पाटील,
झेड.आर.यू.सी.सी. सदस्य, मध्य रेल्वे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.