शेडुंग टोलनाक्यावरील बेकायदेशीर टोल वसुली त्वरीत थांबवा : प्रथमेश प्रभाकर सोमण
सिटी बेल | पनवेल | अरविंद पोतदार |
पनवेल पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेडूंग टोलनाक्यावरील बेकायदेशीर टोल वसुली त्वरीत बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या टोलचे मुख्य व्यवस्थापन यांना दिल्याने टोल चा झोल करणारे टोल नाक्यावाल्यांचे धाबे दणालले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात नागरीकांच्या हिताच्या बाजुने अनेक वेळा टोल विरूध्द आक्रमक पावित्रा अवलंबला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मनसेने खळ-खट्याक आंदोलने टोल नाक्यावर केल्याने अनेक ठिकाणी जनतेची बेकायदेशीर लुट करणारे टोल नाके बंद झाले.असाच एक टोल नाका पनवेल जवळील शेडुंग फाटा येथे असून कर्जत,खालापुर,पनवेल येथील स्थानिक नागरीकांना या बेकायदेशीर टोल वसुलीतून सुट मिळावी या करीता थेट तक्रारी मनसे कडे उपलब्ध झाल्याने काही नागरीकांनी मनसेच नेते प्रथमेश सोमण यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्याने सोमण यांनी शेडुंग टोल नाक्याचे मुख्य व्यवस्थापक यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून स्थानिकांची बेकायदेशीर टोल वसुली त्वरीत थांवविण्याचा इशारा दिला आहे.
अन्यथा या टोल विरूध्द मनसे आक्रमक भूमीका घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असाही इशारा प्रथमेश प्रभाकर सोमण यांनी निवेदन देते वेळी दिला आहे.
Be First to Comment