Press "Enter" to skip to content

नवी मुबंईतील परिवहन सेवा इलेक्ट्रिक होणार

नवी मुंबई परिवहन सेवेत असलेल्या सर्वच 450 बसेस होणार इलेक्ट्रिक

सिटी बेल | नवी मुंबई | घन:श्याम कडू |

स्वच्छतेसह विविध उपक्रम राबवण्यात नवी मुंबई महानगरपालिका कायम पुढे असते.अशात आता नवी मुंबई महानगर पालिकेने आणखी एक पर्यावरण पूरक निर्णय़ घेतला आहे. हा निर्णय आता नवी मुंबई शहरातील परिवहन सेवा पूर्णता पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल असणार आहे.

काही काळातच नवी मुंबई परिवहन सेवेत असलेल्या सर्वच 450 बसेस इलेक्ट्रिक होणार आहेत. सद्या परिवहन सेवेत 180 इलेक्ट्रिक बस असून महिनाभरात आणखी नवीन 50 इलेक्ट्रिक बस येणार आहेत. त्याच बरोबर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने पुढील सहा महिन्यात अजून 100 इलेक्ट्रिक बसची भर देखील पडणार आहे. हे पाहता इलेक्ट्रिक बसची संख्या थेट 350 च्या घरात जाणार आहे. ज्यामुळे 2023 वर्ष उजाडेपर्यंत सर्वच डिझेल, पेट्रोल, सीएनजी बसचे रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये होणार आहे.

खर्चही कमी होणार

इलेक्ट्रिक बस सेवेत आल्यास वर्षाला डिझेल, सीएनजीचा होणारा 65 ते 70 कोटींचा खर्च वाचणार आहे. त्याच बरोबर शहरातील प्रदूषण कमी होण्यास देखील मोठ्या प्रमाणात मदत होईल. त्यामुळे देशातील नवी मुंबई हे एकमेव शहर असेल ज्याची संपूर्ण परिवहन सेवा इलेक्ट्रिक बसवर अवलंबून असणार आहे.

बसमध्ये ग्रंथालयाची सेवा

नवी मुंबई महानगर पालिकेने काही दिवसांपूर्वीच लेट्स रीड फाउंडेशनच्या सहकार्याने एका अभिनव उपक्रमाची सुरुवात केली होची. या उपक्रमान्वये नवी मुंबई मनपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये आता ग्रंथालयाची स्थापना करण्यात येणार आहे. ज्या लांब पल्याच्या मार्गिकेवर धावतात त्या बसेस मध्ये प्रवास करणाऱ्यांकरता ही ग्रंथालयाची सुविधा करण्यात येणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.