
महाडचे डॉ. हिंमतराव बावस्कर प्रतिष्ठित मेडिकल अँड हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित
पनवेल (प्रतिनिधी) महाड येथील बावस्कर हॉस्पिटल अँड क्लिनिकल रिसर्च सेंटरचे डॉ. हिंमतराव साळुबा बावस्कर यांना सीताराम जयपूरिया फाउंडेशनतर्फे आयोजित मेडिकल अँड हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्ड्सच्या तिसऱ्या एडिशनमध्ये प्रतिष्ठित एक्झेम्प्लर लीडरशिप इन रुरल मेडिसिन अँड हेल्थकेअरअवॉर्डसह सन्मानित करण्यात आले. भारतातील आरोग्य यंत्रणा प्रबळ करणाऱ्या आणि वैद्यकीय समुदायाला प्रेरित करणाऱ्या दिग्गज डॉक्टरांना एकूण ९० लाख रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा एसजेएफ सायण्टिफिक सिम्पोजियम अँड अवॉर्ड्स प्रोग्रामचा भाग म्हणून नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला. दिवंगत श्री.सीताराम जयपूरिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित या दिवसभर चाललेल्या परिसंवादामध्येवैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी ‘लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर हृदय-चयापचयाशी संबंधित आजार’ या विषयावर चर्चा करण्यासोबत ज्ञानाची देवाणघेवाण केली. सीताराम जयपूरिया फाउंडेशनद्वारे आयोजित, तसेच एसजेएफचे अध्यक्ष आणि कॉस्मो फर्स्ट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. अशोक जयपूरिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या इव्हेण्टमध्ये नामवंत डॉक्टर, संशोधक आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रमुख एकत्र आले. याप्रसंगी आरोग्यसेवा क्षेत्रात उद्भवणारी आव्हाने आणि नाविन्यपूर्ण संशोधनांवर चर्चा करण्यात आली. मेडिकल अँड हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्ड्ससमारोहासह या इव्हेण्टची सांगता झाली, ज्यामध्ये भारतातीलआणि परदेशातील आरोग्यसेवेचे भविष्य घडवणाऱ्या समर्पित व्यक्तींचा आणि त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगती मत व्यक्त करत सीताराम जयपूरिया फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि कॉस्मो फर्स्ट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अशोक जयपूरिया म्हणाले, ”माझे वडील श्री. सीताराम जयपूरिया यांच्या मानवतावादी मूल्यांच्या मार्गदर्शनाखालीवैद्यकीय समुदायातील सदस्यांच्या अपवादात्मक योगदानाचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे. आज सन्मानित होत असलेल्या डॉक्टरांनी आरोग्यसेवेच्या प्रगतीसाठी आणि अनेक व्यक्तींचे जीवन सुधारण्यासाठी आपले जीवनसमर्पित केले आहे. त्यांची अतूट कटिबद्धता, दयाळूपणा आणि उत्कृष्टतेचा प्रयत्न यामधून खऱ्या अर्थाने वैद्यकीय व्यवसायातील उदात्त भावना दिसून येते.



Be First to Comment