ग्रामीण जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी कोरोना बाबतच्या (उपचार ते अंत्यविधी ) प्रत्येक गोष्टीत प्रशासनाने पारदर्शकता आणावी
सध्या सामन्यमाणसाला काय कराव आणि काय करू नये हे समजेनास झाल आहे. कोरोनाच्या बाबतीत वेगवेगळे मतप्रवाह होत असताना या दुमतामागे लोकांनी काय कराव याबाबत संभ्रम वाढत चालला आहे. मानसिक ताणापासून जे अलिप्त आहेत तेच यामधून वाचत आहेत. दोन टोकाच्या प्रवृत्ती समाजात दिसून येत आहेत. एक म्हणजे कोरोनाची नको इतकी काळजी घेत माणूसकी हरवून बसणारे. दुसरा कोरोना नाहीच अशा अविर्भावात जगणारे. या दोघातला मध्य मिळणे महत्वाचे होते पण ते होताना दिसत नाही. लस ही मिळत नाही आणि वाद ही संपत नाहीत यामुळे सर्व सामान्य जनता भांबावून गेली आहे. सामान्य लोकांनसाठी दावे, प्रतिदावे हे जागेवरच संशोधनाने खोडले जाणे गरजेचे आहेत. जसे मास्कमुळे श्वसनास अडथला येऊन पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्यावर्गाला पटवून देण्यासाठी नॉर्मल असणाऱ्या माणसाला माक्सलाऊन व मास्क न लावता या दोन्हीमध्ये त्याच्या शरीरात ऑक्सिजनची मात्रा किती असते या बाबत संशोधन करून दाखला देणे हे उपयुक्त ठरू शकते. हे होत नाही त्यामुळे प्रश्न निर्माण होत आहेत. मुळात कोरोना संदर्भात डॉक्टरवर्गाचेच एकमत झालेले नाही, त्यामुळे प्रत्येक डॉक्टर वेगवेगळे दावे करत आहे. त्यात मीडियामुळे त्याचा प्रचार प्रसार लगेच होत असल्याने हा सर्व कोरोनाचाधंदा चालू आहे अशी ही चर्चा होऊ लागली आहे. हे कुठे तरी थांबल पाहिजे अशी भावना सामन्य जनतेची झाली आहे. यामुळे आज घरोघरी खोकला, ताप, सर्दी या सारख्या गोष्टीत घरातच उपचार करण्याला प्रधान्य दिले जात आहे. हे चूक कि बरोबर आहे हे समजण्यापलीकडे गेलेल्या जनतेला विश्वासात घेण्या ऐवजी आणखी संभ्रमात टाकण्याचे प्रकार घडत आहेत, प्रत्येक गोष्टीत परमिशन काढावी लागत असल्याने सामन्य गावकऱ्यानाही चिडचिडेपणा येत चालला आहे. हे नक्की चाललाय काय, हे सर्व कधी बदलणार आहे हे कोणीही सांगू शकत नसल्याने एक प्रकारच्या निराशेने त्यांना घेरलेले दिसत आहे. दडपण, दबाव, भीती या गोष्टी मानसिक, शाररीक आरोग्याच्या दृष्टीने अपाय कारक आहेत. कोरोना झाला आणि त्यात गेला तर त्या माणसाचे प्रेत ही दृष्टीस पडत नसल्याने बहुतांशी गावातील पत्येक घरातून यामुळे लपवालपवी चालू झाली तर आरोग्ययंत्रणा यारोगाला अटकाव करण्यास नक्कीच अपुरी पडेल. यापार्श्वभूमीवर या रोगातील उपचार, खर्च, अंत्यविधी याप्रत्येक गोष्टीबाबत प्रशासनाने पारदर्शकता आणणे गरजेचे आहे. त्या अगोदर जनतेला विश्वासात घेण्यासाठी या रोगाबाबतच्या अफवांना संपूर्ण नियंत्रण आणणे, कुठे चुकीचे घडत असेल तर जागेवरच त्या गोष्टीचा बिमोड करणे या गोष्टी प्रशासनाने केल्या तर नक्कीच त्याचा प्रतिसाद जनतेकडून सकारात्मक मिळू शकेल.
मिलिंद पाटील ( पञकार, अलिबाग -सारळ ) ☎️ 9404791798






Be First to Comment