Press "Enter" to skip to content

उद्योजक मंगेश परुळेकर यांना पत्नीशोक

मानसी मंगेश परुळेकर अल्पशा आजाराने दुःखद निधन

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरातील उद्योजक, बांधकाम व्यावसायिक व ओरियन मॉलचे डायरेक्टर मंगेश परुळेकर यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

मानसी मंगेश परुळेकर यांचे 31 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटी येथून अंत्ययात्रा काढण्यात आली होती व अमरधाम स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी आ.प्रशांत ठाकूर, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, उद्योजक राजू गुप्ते, संजय पोतदार, प्रशांत पोतदार, अरविंद सावळेकर, किरण मनोरे, दांडेकर, प्रशांत झुंझारराव, मा.नगरसेवक अनिलकुमार कुळकर्णी, मा.नगरसेवक श्रीनंद पटवर्धन, राजू प्रधान, उद्योजक प्रशांत ठाकूर, मा.शहरप्रमुख सुनीत ठक्कर, छोटु हनुमंते, मिलींद पोटे आदींसह अनेक राजकीय पुढारी, मित्र परिवार व व्यावसायिक तसेच परुळेकर कुटुंबिय उपस्थित होते.

त्यांच्या पश्‍चात त्यांचे पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. दरम्यान परुळेकर कुटुंबियांच्या वतीने सर्वांनी विनंती करण्यात आली आहे की, कोरोना विषाणू संक्रमण पुन्हा वाढत असल्याने निर्बंध येवू घातले आहेत. त्यामुळे मंगेश, सौ.मनांकी किंवा चि.मनन यांचे सांत्वन करण्यासाठी व्यक्तीशः भेट घेण्याचे टाळावे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.