Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा

कविश्री – अरुण दत्ताराम म्हात्रे यांची स्वरचित कविता- “कर्तव्यदक्ष पोलीस !”

= कर्तव्यदक्ष पोलीस =

पोलीस तुम्ही महाराष्ट्र-भारताचे
रक्षणकर्ते तुम्ही मित्र जनतेचे
करण्या पालन कायदा-सुव्यवस्थेचे
लाठीचार्ज कधी नळकांडे धुराचे…

नियम सर्वांनाच असती ते समान
राजा-रंक अथवा असो तो प्रधान
सण-उत्सवांचा आनंद घ्यावा छान
पोलीस नियमांचा राखुनीया मान…

अन्याय अत्त्याचार अन्ं भ्रष्टाचार
व्हावेत राज्य-देशांतून ते हद्दपार
सत्त्य बाजू निट पडताळली जावी
न्यायदेवतेचा व्हावा जय-जयकार…

उन्हा-पावसात निभावता हो ड्युटी
कधी हवी तेव्हा नाही मिळत सुट्टी
स्वअडचणी-दुःख सारुनी बाजूला
कर्तव्यासोबत नेहमी तुमची गट्टी…

सभा- मोर्चे- सणवार- उत्सवांना
दक्ष असता दूर ठेवूनी कुटुंबीयांना
महान कर्तव्य दिवस-रात्र तुमचे
सलाम आमचा आहे पोलीस बंधूंना..

कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे.
वरळी मुंबई, मो. 9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.