Press "Enter" to skip to content

खरेदीसाठी बच्चे कंपनीची लगबग

नाताळच्या सणामुळे, विविध प्रकारच्या वस्तू बाजारात दाखल

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

नाताळाच्या सणामुळे बच्चे कंपनीला लागले सुट्टी असल्यामुळे बाजार पेठेत खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे.या सणाच्या निमित्ताने अनेक ठीकांनी रोषणाई करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी विविध आकर्षक सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ ठेवण्यात आल्याने खरेदी करणा-या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सण कोणताही आणि कुठल्याही धर्माचा असो,मात्र उत्साहाने साजरा करण्याची परंपरा तालुक्याच्या ठिकाणी जोपासली जात असते.भगवान येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा केला जात असतो.नाताळ’ हा सण साजरा करण्यासाठी ,विविध ठिकाणी असलेल्या चर्चमध्ये रोषणाई आणि आकर्षक सजावट केलेली पहावयास मिळत आहे.

या दिवशी ख्रिसमस ट्रीचं एक वेगळं महत्त्व असते.यामुळे बाजार पेठेत विविध वस्तू दाखल झाल्या आहेत.यामध्ये सांतक्लॉजचे कपडे, ख्रिसमस ट्री सजविण्यासाठी लागणार्‍या विविध वस्तूंचा समावेश मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त बाजापेठेत खरेदीसाठी आणी शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांना भेटत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.