कामगार नेते महादेव घरत, महेंद्र सावंत यांच्या नेतृत्वामुळे कामगारांना मिळाला न्याय
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्यातील कॉनकर डी आर टी या केंद्र पुरस्कृत कपंनी मध्ये हाऊस किपींग डिपार्टमेंट मधील 28 स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांना गेल्या 6 महिन्या पासून ठेकेदार व कॉनकर व्यस्थापनाने पगार न दिल्यामुळे कामगार नेते महादेव घरत, महेंद्र सावंत यांच्या नेतृत्वात कामगारानी कामबंद आंदोलन पुकारलेले होते.

सदर कामगारांना भविष्य निर्वाह निधी, इ एस आय सी व इतर सामाजिक सुरक्षेच्या फायद्यापासून कामगारांना वंचित ठेवण्यात आले होते.त्याचा उद्रेक होऊन नियमाप्रमाणे कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. सदर आंदोलनाला इतर कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देउन संपूर्ण कॉनकर कंपनी बंद केले होते.शेवटी कामगार नेते महादेव घरत, महेंद्र घरत यांच्या नेतृत्वापुढे कंपनी प्रशासनाला नमते घ्यावे लागले.
डीआरटी कंपनी प्रशासनाने कामगारांच्या मागण्या मान्य करत त्यांचा थकीत पगार देण्याचे व इतर सर्व सुविधा देण्याचे मान्य केले आहे. कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सर्व कामगारांनी महादेव घरत, महेंद्र सावंत यांचे आभार मानले.













Be First to Comment