Press "Enter" to skip to content

“नवरा माझा भवरा” नाटक कर्जत मध्ये

कोव्हीड महामारी नंतर कर्जत मध्ये प्रथमच 25 डिसेंबरला रॉयल गार्डनच्या रंगमंचावर वाजणार नाटकाची घंटा

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कोव्हीड महामारी नंतर कर्जत मध्ये प्रथमच “नवरा माझा भवरा” या नाटकाच्या माध्यमातून नाटकाची घंटा वाजणार आहे.

किरण थिएटर निर्मित, उर्वीजा कलाप्रेमी प्रकाशित लेखक, दिग्दर्शक संदीप विचारे “नवरा माझा भवरा” हे कौटुंबिक विषयावर आधारित भोवऱ्या सारखे गरागरा हसवणारे कौटूंबिक कॉमेडी नाटक नवं वर्षाच्या पूर्व संध्येला म्हणजे 25 डिसेंबर 2021 रोजी रॉयल गार्डनच्या रंगमंचावर सादर होणार आहे अशी माहिती लेखक, दिग्दर्शक संदीप विचारे यांनी पत्रकार परिषदे मध्ये दिली. याप्रसंगी निर्मिती प्रमुख अजय भानुशाली, कार्यक्रम प्रमुख विकास चित्ते, वैदेही पुरोहित उपस्थित होत्या.

बापू कालिया अर्थात प्रदिप पटवर्धन ब-याच वर्षांनी कर्जत मध्ये येणार आहेत त्यांच्या सह या नाटकात टीव्ही मालिकेतील कलाकार सुद्धा दिसणार आहेत. कोव्हीड -19 चे सर्व नियम पाळून हे नाटक सादर होणार आहेत असे संदीप विचारे यांनी यावेळी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.