ओढ लागली तुझी आई ,
मन झालं कासावीत तू दिसेनाशी
मन झालं कावर-बावर तू कोठे
मनाला दिशा समजतं नाही कुठ
ओढ लागली तुझी आई , …….
दिवस रात्र जातो सांज प्रहर
क्षण क्षण जातो एक एक क्षण
तू नसताना संपुर्ण तपा एवढ
ओढ लागली तुझी आई , …..
आई तुझी पुण्याई एवढी
तुझ्या मुले मिळाला मान सर्वाना
आई अक्षर फक्त दोन
परन्तु संपूर्ण विश्व सामविले त्यात
ओढ लागली तुझी आई , …..
आई नावाचं रसायनच वेगळं
ज्यात राग द्वेष क्रोध हास्य काही
मिश्रण केले काही प्रेमचं मिळत
ओढ लागली तुझी आई , …
…
सकाळी उठल्यावर फक्त
आठवते मनी तूच आणि तूच
प्रेमाची सावली दिली ती तूच
मायेची ऊब दिली ती तूच
ओढ लागली तुझी आई , ….
..
आई आई आई आई
किती हंबरडा फोडून ओरडू
आंम्हि घातलेली साद ऐक
लगेच तयारी करून येणा
जिथं असशील तेथून
ओढ लागली तुझी आई , …..
कवी
सानिका गावंड
आवरे उरण
Be First to Comment