Press "Enter" to skip to content

शेकडो वर्षानी घेतला एका प्राचीन तोफेने मोकळा श्वास

उरण द्रोणागिरी किल्ल्याच्या शोध कार्यात सापडली प्राचीन घडीव बांगडी तोफ

सिटी बेल | उरण | अजय शिवकर |

शिव संवर्धन संस्था शिवराज युवा प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी एक मोठी मोहीम काल पार पाडली. या मावळ्यांनी उरण द्रोणागिरी किल्ल्याच्या मातीत गाडली गेलेली एका शिवकालीन तोफेचा शोध घेऊन तिला बाहेर काढले.

या महाराष्ट्राला खूप प्राचीन इतिहास लाभलेला आहे त्यापैकी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजधानीचा ठेवा या जिल्ह्याला दिला तोच हा जिल्हा रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील महाराष्ट्रातील एक बलदंड डोंगरी व सागरी असा मिश्र किल्ला म्हणजेच द्रोणागिरी किल्ला.

प्राचीन काळापासून सागराचे महत्व व समुद्राचा होणारा व्यापार यावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ल्याची निर्मिती केली गेली त्यापैकीच एक द्रोणागिरी किल्ला. याच किल्ल्याच्या रक्षणासाठी सात वाहनापासून आपल्याला काही खाणाखुणा या किल्ल्याच्या परिसरात मिळतात शिलाहार राजा भोज व महादेव देवगिरीचे यादव यांच्या मध्ये झालेले घनगोर सागरी युद्ध हे या द्रोणागिरी ला साक्षी आहे याच सागरामध्ये शिलाहार हे घराणे शेवटचे नष्ट झाले आणि याच सागराचे महत्व जाणून कधी एकेकाळी शेकडो वर्षापूर्वी या द्रोणागिरी च्या रक्षणासाठी या परिसरात पूर्णपणे तटबंदीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात.

कालांतराने पोर्तुगीजांच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये या किल्ल्याचा वापर केला गेला पण मराठ्यांच्या पराक्रमाने वसई मोहिमेच्या वेळी या किल्ल्यावरती स्वराज्याचा भगवा ध्वज शेवटचा कायमस्वरूपी फडकला. याच किल्ल्याच्या रक्षणासाठी अनेक वास्तू आज मातीखाली गाढलेल्या या परिसरामध्ये आहेत. काळाच्या ओघात हा इतिहास कुठेतरी मागे चाललाय यासाठी स्थानिक दुर्ग संवर्धन संस्था यांनी आजपर्यंत संवर्धन जतन जनजागृती स्वच्छता मोहीम अशी कितीतरी उपक्रम स्थानिक दुर्गसंवर्धन संस्थाने आजपर्यंत राबवलेले आहेत.

त्यापैकीच स्थानिक शिव संवर्धन संस्था शिवराज युवा प्रतिष्ठान यांच्या सर्व मावळ्यांनी त्यांचे मुख्य मार्गदर्शक अपरिचित गडकोट शोध दुर्ग अभ्यासक श्री जयकांत शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध मोहीम या परिसरात लावले आणि तब्बल कित्येक महिन्यानंतर खूप मोठा इतिहासाचा साक्षीदार म्हणजेच काल चार तारखेला मिळालेली एका मोठ्या गटारांमध्ये साधारण साडेसात फूट लांब आणि अडीच टन वजनाची एक भली मोठी बांगडी च्या आकाराची तोफ आपल्याला शोध मोहिमेमध्ये मिळाली.

कित्येक वर्षांमध्ये याठिकाणी गटार रस्ता चिखल दलदल याच्या खाली साधारण १०ते १२ फूट खाली ही तो गाडली गेलेली होती काही स्थानिकांना याबद्दल माहिती होतं ज्यांनी अनेक वर्षापूर्वी ही तोफ पाहिल्याचे नोंद होती. याचा शोध जयकांत शिखरे अभ्यासक व स्थानिक शिवप्रेमी उरणकर द्रोणागिरी कर यांनी घेतला आणि हा मातीत गाडलेला शेकडो वर्षांचा इतिहास साऱ्या जगासमोर आणला आणि या तोफेला एक मोकळा श्वास दिला.

इतिहासाचे जतन आणि संवर्धन हे प्रत्येक शिव भक्ताचे प्रत्येक इतिहास प्रेमींचा प्रत्येक स्थानिक ग्रामस्थांचा अधिकार आहे कर्तव्य आहे हे साऱ्या जगाला कळावं हा संदेश शिवराज युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व उरंणकर आणि सार्‍या जगाला दिलेले आहे. लवकरच पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शन आणि स्थानिकांच्या समितीच्या निर्णयांनी या तोफेचे एक मोठे स्मारक बनवून भविष्यामध्ये हा इतिहास जगाला कळावा यासाठी प्रयत्नशील असेल. तसेच सदर तोफ ही भारतीय पुरातत्व विभागाचे सुचने प्रमाणे कारवाई करणार असल्याचे शिवराज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश ठाकूर यांनी सांगितले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.