Press "Enter" to skip to content

जागतिक संगीत दिवस साजरा

वरदविनायक कॉम्प्लेक्स मधे “चला गाऊया करावके” या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन


प्रतिनिधी : पनवेल
जागतिक संगीत दिवस आणि पितृदिन यांचे औचित्य साधून नवीन पनवेल, सेक्टर ५ येथील वरदविनायक कॉम्प्लेक्स मधे “चला गाऊया करावके” या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पद्मनाभ व मुग्धा भागवत या संगीतप्रेमी दंपत्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले. कवयित्री गीतकार वरदा जोशी आणि गायिका शलाका देशपांडे, वृंदा भागवत, युवा गायिका तन्वी मिनासे, तुषार देशपांडे, शशांक व रीना मिनासे, अभिजित कोल्हटकर यांच्यासह युवावर्गाने या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

गणेशवंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यानंतर मराठी हिन्दी चित्रपट गीते, भावगीत, लावणी, गवळण, विडंबनगीते अशा विविध प्रकारच्या गीतांचे सादरीकरण कराओके आणि वाद्यवृंदाच्या साथीने करण्यात आले. गंधार देशपांडे याने संवादिनी आणि माधव भागवत याने गायकाना तबलासाथ केली. यानंतर पालकांच्या हस्ते केक कापून पितृदिन साजरा केला गेला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.