एकता कॅटॅलिस्टच्या वर्धापन दिन सोहळ्या निमीत्त, टाऊनशिप येथे “भव्य कामगार मेळावा” आणी “ओबीसी मेळावा”
सिटी बेल | उरण | सुभाष कडू |
“एकता कॅटॅलिस्ट” च्या वर्धापन दिन सोहळ्यानिमीत्त भव्य कामगार मेळावा व ओबीसी मेळावा मल्टीपरपज हाॅल जेएनपिटी टाऊनशिप येथे आयोजीत करण्यात आला होता. यावेळी कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांची “ओबिसी व्हीजे -एनटी जनमोर्चा संघटनेच्या” महिला प्रदेशाध्यक्षापदी निवड झाल्याबद्दल कामगार व विवीध संघटनांच्या पदाधीकार्यांनी सत्कार केला. या मेळाव्याचे आयोजन “कोकण श्रमिक संघ”, “बी.एम.टी.सी.कर्मचारी पुनर्वसन समिती”,आणी “ओबिसी व्हीजे -एनटी जनमोर्चा संघटना”, या तिन्ही संघटनांनी संयुक्तपणे आयोजीत केल होतं.या मेळ्याव्याचे आध्यक्षस्थान ओबिसी व्हीजे -एनटी जनमोर्चा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी भूषवीले.

या मेळाव्याला उरण,पनवेल,नवीमुंबई, ठाणे,मुंबई,कल्याण आदि महाराष्ट्रातील विवीध भागातून असंख्य दलीत ,मच्छिमार, स्थानीक भूमिपूत्र कामगार व ओबीसी बांधव उपस्थीत होते.
या कार्यक्रमात कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांच्या एकता कॅटॅलिस्ट मार्फत भगवान माळी ,संजीवन म्हात्रे,देवीदास थळे, यांना “नवरत्न कॅटॅलीस्ट पुरस्कार” देवून सन्मानीत करण्यात आले.

यावेळी बोलताना कामगारनेत्या श्रुती म्हात्रे म्हणाल्या प्रस्थापीत सामाजाने जाणूनबूजून बाजूला ठेवलेला समाज म्हणजे वंचीत. आज देशात आसे 80% वंचीत आसून फक्त 20% प्रस्थापीत देशावर हुकूमत करत आहेत.अशा वंचीतांना न्याय मिळवून देण्यासाठी माझे बाबा कामगारनेते शाम म्हात्रे यांनी आयुष्य खर्ची घातला.त्यांचा आधूरा राहीलेले काम ,त्यांचे स्वप्न मि पूर्ण करेन आणी देशातील वंचीतांना न्याय देण्याचे काम करीन .
या मेळाव्यात व्यासपिठावरील ओबिसी व्हीजे -एनटी जनमोर्चा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सानप, ओबिसी व्हीजे -एनटी जनमोर्चाचे राष्ट्रीय महासचीव बाळाजी शिंदे , हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय आध्यक्ष कामगारनेते अॅड संजय वढावकर, बेलधार भटका समाजाचे राज्य आध्यक्ष राजूभाऊ साळूंके, नारायण खडगे,अॅड शेरेकर मॅडम, ओबीसी राज्य संघटक अनिल पवार ओबिसी व्हीजे -एनटीचे जिल्हा आध्यक्ष ज्ञानदेव पवार, सुरेश कांबळे, विनायक वाजपेयी, विष्णू कुर्हाडे, शौकतभाई तांबोळी, आर फाउंडेशनचे बबन कांबळे, सदानंद भोपी,रामनाथ पंडीत, यांनी उपस्थीत कामगारांना मार्गदर्शन केलं.













Be First to Comment