Press "Enter" to skip to content

समाजसेवक महादेव नारायण गायकर यांना पुरस्कार

पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा रायगड जिल्ह्याचा रायगड भूषण पुरस्कार जाहीर

सिटी बेल | पनवेल|

पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांचा ५ वा वर्धापन दिन व पत्रकार संमेलन रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी चिंतामणी लॉन्स सोयगाव चौफुली सटाना रोड सोयगाव ता. मालेगाव (नाशिक) येथे अखील भरतीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी भारतातील नामांकित व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असतात याप्रमाणे यावर्षाचा रायगड जिल्ह्यातील पुरोगामी संघाच्या वतीने समाजसेवक महादेव नारायण गायकर मु. रिटघर, ता. पनवेल, जि. रायगड. यांना संघाचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केला असून बी. जी. कोळसे पाटील राज्य सल्लागार प्रमुख न्यायाधीश उच्चन्यायालय मुंबई. यांच्या अध्यक्षतेखाली नामदार दादाजी भुसे साहेब कृषी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.