Press "Enter" to skip to content

महडच्या वरदविनायक मंदिरात साकारली कडधान्याची सुंदर रांगोळी

सिटी बेल | काशिनाथ जाधव | महड
|

मुंबई पुणे महामार्गावर हे अष्टविनायका पैकी असेलेले महड गावातील वरद विनायक यांचे दर्शन घेण्यासाठी खालापूर ,चौक, खोपोली , कर्जत ,पनवेल ,रसायनी या परिसरातील भक्तांनी आपल्या लाडक्या वरद विनायकाचे दर्शन घेतले.त्याच बरोबर आज अंगारकी चतुर्थी निमित्ताने सुंदर अशी मनमोहक कडधान्यांची रांगोळी काढण्यात आली. तसेच गणेश भक्तांना दर्शन घेण्यासाठी वहानांची व्यवस्था तसेच थंड पाण्यांची व्यवस्था ठिक – ठिकाणी करण्यात आली होती.

गेले काही दिवस वातावरणात गारवा समवेत पाऊस पडत होते. मात्र आज अंगारकी चतुर्थी च्या दिवशी गणेशभक्ता मध्ये अनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. दर महिन्याला संकष्ठी चतुर्थी तसेच सहा महिन्यातून येत असलेली अंगारकी चतुर्थी येत असल्याने अनेक भक्त गण दर्शन घेण्यासाठी येत असतात.वरद विनायक म्हणजे इच्छा पूर्ती करणारा अशी श्रद्धा अनेक भक्तांची असल्यामुळे अनेक भक्तगण मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने रांगेत उभे राहून या वरद विनायकाचे दर्शन घेत असतात.

या अंगारक संकष्टि चतुर्थी च्या निमित्ताने कडधान्यांची रांगोळी ( वरद विनायक फुल व कडधान्ये रांगोळी मंडळ महड )यांनी साकारली रांगोळी चे सुंदर असे दृश भक्तगणांनाचे मन आकर्षिले जात होते . आणि आपल्या जवळ असलेल्या मोबाइल मध्ये टिपण्याचा प्रयत्न करीत होते.अशीच सुंदर रांगोळी रवि आचर्य- नेरळ, मंगेश देशमुख- माणकिवली, सचिन पाटील -कलोते,यांनी कड़धान्यांची रांगोळी साकारण्यात आली. यामध्ये कणी ५० कीलो.,शाबुदाणे १० कीलो,मूगडाळ ५ किलो,काळे तील २ किलो,नाचणी ५ कीलो,बाजरी ३ कीलो. किलो च्या कडधान्याचा समावेश करण्यात आला.या या रांगोळी साठी सहकार्य – रोहीत प्रभू- चांभार्ली,संपना प्रभु,वरद पवार – कल्याण,दिलीप राले – पनवेल,कै. निवृत्तीनाथ गिरी – जळगांव,रोहीदास गायकवाड – मोहपाडा,कै. सरस्वती कदम – देवनाव्हे,सौरभ खांडेकर – भिसे रोहा,अनिल देशमुख – सवणे अदि ने या रांगोळी साठी सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.