आई तुझी आठवण येते ग
आई तुझी आठवण येते ,
सांग ना तू गेली कुठे ,
जीवाचा पाळणा करून ,
लहानाचे मोठे केले ,
आई तुझी आठवण येते, ग
नाही पाठविले कुणाच्या दारी
स्वाभिमान शिकविला या उपरी
कष्ट करून जगायला केले तयारी
आई तुझी आठवण येते .ग…
जो वर आहे चंद्र आणि सूर्य
तो वरी राहील तुझे कार्य
कितीही केले तरी विसरणार नाही
आई तुझी आठवण येते ग…
लहानपणी मुखीचा घास
मुखी भरवुनी केले सुखी
जीव ओवाळून टाकून केले मोठे
आई तुझी आठवण येते ग….
आयुष्याची दोरी तुझ्या हाती
बालपणी वडिल गेले कामी
सांभाळले तू पदोपदी पदरी
आई तुझी आठवण येते .ग.
..
कुठे जाऊन राहिली आता तरी
तुझी तान्हे , बाळ पोरकी झालं
कोण सांभाळ करील त्यांचा आता
आई तुझी आठवण येते .ग
आई ची माया असते निराळी
आई रागावली परी माया जवळी
आई आई आई बोलू कुठे शोधू
आई तुझी आठवण येते ..ग….
आई मि बहेरुन आल्यावर आवज
देते आवाज मला आली का ग तू
आता कुठल्या दारी शोधू कानोसा
आई तुझी खरच आठवण येते ग
सानिका गावंड
आवरे उरण
Be First to Comment