Press "Enter" to skip to content

काँग्रेस नोंदणीला सुरुवात

काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाला शेलघर येथून सुरुवात

सिटी बेल | शेलघर |

संपूर्ण देशभरात आज पासून काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला सुरुवात होत आहे. रायगड जिल्ह्याच्या सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात आज पासून शेलघर येथून करण्यात आली. रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या सदस्य नोंदणी अभियानाला आज पहिल्या दिवसापासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

याप्रसंगी अखील भारतीय काँग्रेस कमिटी चे चिटणीस आणि कोकण प्रभारी बी एम संदीप, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस नंदा म्हात्रे, महीला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रध्दा ठाकूर, चंद्रकांत पाटील, आनंद सिंग, ज्येष्ठ नेते जी आर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष महादेव कटेकर, कार्याध्यक्ष सुदाम पाटील, उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी, इंटक जिल्हा अध्यक्ष किरीट पाटील, मिलींद पाडगावकर, वसंत काठावले, वैभव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.