प्रिये
प्रिये तुझ्या डाव्या डोळ्यावर बट रुळली
तेजस्वी आकर्षक चेहऱ्यावर भर पडली
तहानलेल्या हरिणीला जसे मृगजळ दिसले
काळ्याभोर ढगांनी तुझा केशसंभार संवरीला
झाकोळल्या आकाशातून चंद्र रुपी चेहरा उमटला
रेखीव भालावर बटीला फुंकर घालते ती तशीच अवखळ पुन्हा पुन्हा तेथेच येते
लाल बुंद ओठातून शुभ्र दंत पंक्ती चमकती
तुझा हसरा चेहरा उत्तेजित करतोय मनाला
किती कवित्व करावे काही सुचेना
माझ्या अफाट कल्पनेला
फौजी मुकुंद इनामदार, नवीन पनवेल
Be First to Comment