साठवण
कुठुन एकसा ढग शुभ्र तो
विहरत होता नभामधे
पक्षीही वाट चुकला तेव्हा
पाहत होता तुझ्याकडे
लालसर आभाळी फडके
जरीपटका तो वनामधे
हर महादेव घोष एकसा
दुमदुमला हो मनामधे
सर्पाच्या त्या वावटळीने
मार्ग उमटला मातीमधे
वाऱ्यासही हवेसे वाटे
घोंघावणे त्या झाडीमधे
कसे कायसे वर्णन करु मी
सृष्टीचे ह्या काव्यामधे
साठवणे ते अवघड आहे
निसर्गास त्या शब्दांमधे
- श्री. स्वानंद नंदकुमार मराठे.
पुणे
Be First to Comment