Press "Enter" to skip to content

उरणचा विपुल लफड्यात

बहुचर्चित लफडं या सिनेमात दिसणार उरण-भेंडखळ गावचा सुपुत्र विपुल प्रकाश भोईर

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

महेश थोरात यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या लफडं या चित्रपटाचे पोस्टर लॉन्चिंग व कलाकार परिचय यासंदर्भात एक शानदार कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील झालेत व पोस्टर अनावरण सोहळा पार पडला तसेच लफडं या चित्रपटाच्या कलाकारांचा परिचय देखील झाला. लफडं या चित्रपटात उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे सुपुत्र विपुल प्रकाश भोईर हा एका चांगल्या भूमिकेत दिसणार आहे व विपुल याने या अगोदर बऱ्याच फिल्म केल्या असून त्याने लफडं या फिल्म साठी धुळे या शहरात ऑडिशन दिले व त्यात त्याची निवड झाली लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण विविध ठिकाणावर होणार आहे.

विपुल प्रकाश भोईर

या चित्रपटात बहुतांशी कलाकार हे नवोदित असून चित्रपटाचे दिग्दर्शक महेश थोरात हे असून निर्माता महेश थोरात व श्रीमती सीमा साखरकर हे आहेत तसेच असोसिएट दिग्दर्शक सचिन बिऱ्हाडे हे करणार असून गीत संगीत नितीन-प्रसाद टीम यांचा असेल तसेच प्रॉडक्शन श्री चेतन सोनार व भटू चौधरी हे बघणार आहेत लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण होऊन हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे .

महाराष्ट्रातील तमाम रसिकप्रेक्षकांना विनम्र विनंती आहे की हा चित्रपट आपण सर्वांनी नक्कीच चित्रपट गृहात जाऊन बघावा असे आवाहन महेश थोरात फिल्म प्रोडक्शन व श्रीमती सीमा साखरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे‌.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.