माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या महाविद्यालय विकास समितीवर सदस्यपदी नियुक्ती
सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या विश्वस्त कार्यकारी मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शिक्षण उधोग, संशोधन व समाजसेवा या क्षेत्रातून शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख व उरणचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या कार्यरत असलेल्या महाविद्यालय विकास समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे गेले तीस वर्षातील सामाजिक क्षेत्रातील कार्य व उल्लेखनीय शैक्षणिक क्षेत्रातील कार्याने प्रभावित होऊन, त्यांच्या हया कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सदर नियुक्ती पत्र हे कोकण ज्ञानपीठ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहे. या नियुक्तीमुळे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.












Be First to Comment