कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोनतर्फे कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला शैक्षणिक क्षेत्र भेट
सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
आपल्या देशाचे मिसाईल माणूस म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांच्या वाचन प्रेरणा दिना निमित्त तसेच विद्यालयाची शैक्षणिक श्रेत्र भेट सारडे येथील नवीनच उदयास आलेल्या निसर्गरम्य कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मधे संपन्न झाली.
या शैक्षणिक श्रेत्र भेटीच महत्व लक्षात घेता विद्यार्थी वर्गास निसर्गातून काही गोष्ठी शिकता याव्या तसेच निसर्गाच महत्व विद्यार्थीना समजावे या प्रमुख उद्देशातून ही क्षेत्र भेटीच आयोजन करण्यात आल होते. विद्यालयांच्या गुरुकुल प्रमुख बल्लाळ मॅडम तसेच भगत सर, वडीक्ते सर ,भारती म्हात्रे मॅडम,पाटील सर, दाढाले सर, पोलीस पाटील संतोष मोकळ सर, सारडे विकास मांच्याचे कार्याध्यक्ष रोहित पाटील,त्रिजन पाटील आणि विद्याथी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी कोमनादेवी ऑक्सिजन पार्क पहिली शैक्षणिक भेट दिल्याबद्दल विद्यालयाचे तसेच बल्लाळ मॅडम आणि शिक्षक वर्गाचे मनःपूर्वक आभार मानले तसेच विद्यायलाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांनी झाडाच्या बाजूच्या गवताची सफाई करून शेवटी परिसर स्वच्छते बद्दल संदेश देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.












Be First to Comment