जाणुण घ्या कुठे पाहु शकता निकाल !
सिटी बेल लाइव्ह / मुंबई #
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज दहावीचा निकाल जाहीर करणार आहे. निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागात मार्च २०२० मध्ये १० वीची परीक्षा घेण्यात आली होती.
दहावीचा निकाल कसा पाहू शकता?
www.maharesult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
या वेबसाईटवर निकाल पाहू शकता,तर www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.तसेच www.mahasscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध केला जाईल.कोरोनामुळे दहावीचा निकाल जाहीर करण्यास विलंब झाला असला तरी 29 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना www mahresult.in , www.sscresult.mkcl.org किंवा www.maharashtra education.com या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तर छायांकितप्रती साठी ३० जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे, असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
Be First to Comment