Press "Enter" to skip to content

मुंबईत पथनाट्याचे सादरीकरण

बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय तळोजाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई येथे ‘ति’ या पथनाट्याचे केले सादरीकरण

सिटी बेल | उरण | सुभाष कडू |

तळोजा येथील बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालय व छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर वर ‘ति’ या पथनाट्याचे सादरीकरण केले. स्त्रियांवरील अत्याचार आणि स्त्रीभूण हत्येवर आधारीत आसलेल्या या पथनाट्याच्या माध्यमातून ऐन नवरात्रीत समाजाला एक सूंदर संदेश विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयात,दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई चे सर्व न्यायाधीश तर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर वर रेल्वे न्यायालयाचे न्यायाधीश व पोलीस कर्मचारी आणि बाळा साहेब ठाकरे विधी महावीद्यालयाचे चे प्राचार्य डॉ० राजेश साखरे आणि सर्व विद्यार्थी मित्र. उपस्थीत होते.

सदर ति हे पथनाट्य स्वातंत्र्याचा आमृतमहोत्सव कार्यक्रमा आंतर्गत बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय तळोजा आणि तालुका विधी समिती पनवेल याच्या संयुक्त विद्यमाने सादर केल गेल. समाजातील स्त्रियांचे महत्व आधोरेखीत करणारे, तसेच स्त्रियांवरील अत्याचार आणि स्त्रीभूण हत्या थांबल्या पाहीजे या उद्देशाने समाज जागृती करण्यासाठी सादर केलेल्या या पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आभिनेता अजय जोशी यांनी केल. वारंवार होणार्‍या स्रियांवरील आत्याचारामूळे आज समाजाची प्रतीमा मलीन होत चालली असताना बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय तळोज्याच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या समाजजागृती बाबत उच्चन्यायालयाच्या न्यायमूर्तीने कौतूक केलं

तर या पथनाट्यामध्ये मध्ये शुभम तिवारी
शैलेश गोळे, सागर कांबळे,अजय जोशी ,विवेक भोपी,विकेश पवार,वासिम शेख,अनिल थोरात,सचिन साकत,अश्विनी कटारे स्नेहा मोर्बेकर्,रुपाली पाटील,नम्रता खानवालकर,सयाजी वाघमारे,विजय कलोते,अक्षय पाटील,अविनाश कदम
सुनैना माने,कमलाकर सोनार,प्रवीण ज़ितेकर,सायली गुरव, तेजश्री बहिरा या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या सर्व विद्यार्थ्यांचे बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचे संस्थापक व शिवसेना नेते बबन दादा पाटील कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.