श्रावण
हिरवाईचे वस्र लेवूनी
श्रावण आला रंग माखूनी
आनंदाला उधाण आले
क्षणात मरगळ दूर पळाली
श्रावण आला रंग माखूनी
मोहक सुंदर रूप देखणे
सृष्टीचे लावण्य पाझरे
हिरवाईचे लेणे लेऊन
डुलू लागली झाडेपाने
सृष्टीचे हे रूप मनोहर
दिसता हरपून जाते तनमन
पंख लागते मनास अलगद
दूर कपारी घेत भरारी
अस्तित्वांचे भान हरवूनी
हिरवळीत मी हिरवा होतो
श्रावणात मी श्रावण होतो
श्रावणात मी श्रावण होतो.
अनंत खोत, मुंबई





Be First to Comment