राधामोहन
यमुनातीरी
कदंबातळी
राधामोहन
प्रीत आगळी
कदंब फुले
फुलली सृष्टी
रम्य निसर्ग
सुखवी दृष्टी
सुंदर राधा
सावळा हरी
अजरामर
प्रीत बावरी
नसे वेगळे
एकचि सारे
सावळबाधा
प्रेमळ वारे
राधा अंतरी
श्याम मुरारी
रंगी रंगला
तो गिरिधारी
सौ. विजया चिंचोळी
खारघर, नवी मुंबई








Be First to Comment