रोटरी क्लब ने वाहिली स्वर्गीय किशोर कुमार यांना संगीतमय श्रद्धांजली : बहारदार कार्यक्रमात सादर केली आजरामर गिते
सिटी बेल | पनवेल |
कलासागर परिवार निर्मित आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर तसेच रोटरी क्लब ऑफ उलवे नोड आयोजित स्वर्गीय किशोर कुमार यांना श्रद्धांजली अर्पित करण्याच्या कार्यक्रमात बहारदार किशोर गीतांचा अनुभव श्रोत्यांना अवर्णनीय आनंद देऊन गेला.रवि नाईक यांचे आयोजन आणि श्रीकांत मुंबईकर यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत दादा ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती होती.सदाबहार गायक,अभिनेते,निर्माते,संगीत दिग्दर्शक स्वर्गीय किशोर कुमार यांच्या स्मृतीदिनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नगरसेविका वर्षा रवी नाईक, रवी नाईक यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाला मूर्त रूप देण्यात आले. गुरुवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता पनवेलच्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा बहारदार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय किशोर कुमार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहात सर्व गायकांचे कौतुक केले.रवी नाईक, नरेश बुल्लू, गोपाळ पाटील, किशोर गवादे, जीतू पाटील,गिरी,पी.सी.म्हात्रे,कृष्णा पाटील, समाधान पाटील,राज नाईक,सिनियर आर टी ओ निरीक्षक निलेश बनसोडे यांनी बहारदार आवाजात स्वर्गीय किशोर कुमार यांची गीते सादर केली तर दया बाबरे,सोनल नाईक,सरिताजी यांनी त्यांना युगल गीतांना साथ दिली.डॉ गवादे यांनी स्त्री व पुरुष अशा दुहेरि आवाजात गाणे गात धमाल उडवून दिली.
संजय साउंड सर्व्हिसेस यांनी उत्तम प्रकारे ध्वनी नियोजन केले.राजन म्हात्रे यांच्या प्रकाश योजनेने कार्यक्रमात रंगत भरली.हा कार्यक्रम फेस बुक तसेच अन्य समाज माध्यमांवर लाईव्ह दाखविला गेला,हजारो दर्शकांनी कार्यक्रमाचा सोशल मिडियावर आनंद लुटला.अजित काकडे यांनी थेट प्रक्षेपण सुरळीत दाखवत प्रेक्षकांना अप्रतिम कार्यक्रमाचा आनंद दिला.

रितेश तिवारी यांच्या खुमासदार शैलीतील निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली.सह निर्माते पुरषोत्तम म्हात्रे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत नगरसेवक तेजस कांडपिळे,माजी नगरसेविका नीता माळी,सिटी बेल समूह संपादक मंदार दोंदे, विवेक पाटील,भाजपा उत्तर रायगड जिल्हा संघटक सरचिटणीस अविनाश कोळी, रोटरी क्लब से असिस्टंट गव्हर्नर सुनील कुरूप, रोटरी क्लब ऑफ रसायनी चे प्रेसिडेंट गणेश काळे, रोटरी क्लब ऑफ खोपोलीचे प्रेसिडेंट सुरेश खेडकर,अलका कोळी,पुरण सिंग मेहरा,सुवर्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment