Press "Enter" to skip to content

मातेचा जागर..

मातेचा जागर..

नवरात्री उत्सव करुनी मातेला पूजूया
उदोकार गर्जूनी अंबेचा जोगवा मागूया ||१||

प्रतिपदेलाच अंबा सिंहासनी विराजते
शस्त्र घेऊनी हाती माता दुष्टासी संहारते ||२||

नाना देही नाना रुपी माता असे प्रगटली
भक्तीभावाची ज्योत सा-या मनात जागवली ||३||

आदिमाया ती जगदंबा ती सकलांची आई
शिरी असावे छत्र कृपेचे तुझे अंबाबाई ||४||

शरण तुजला आलो रक्षण आमुचे करी
शांती, समाधानाचे दान घाल माझ्या पदरी ||५||

सौ. सुजाता कुलकर्णी, आदई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.