अलिबाग तालुक्यातील बेलोशी ग्रामस्थांनी घालून दिला अनोखा आदर्श
सिटी बेल लाईव्ह/ आलिबाग
राजेश बाष्टे #
दाग अच्छे है म्हणत… वॉशिंग पावडर ची जाहिरात बघितली तर वाईटात सुद्धा चांगुलपणा असतो यावर विश्वास बसतो. कोरोना चे सुद्धा तसेच काहीसे आहे. तो कितीही वाईट असला तरीही बरंच शिकवून गेलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसा माणसातलं नातं घट्ट बनवतोय. यावर विश्वास बसत नसेल तर ही बातमी वाचल्यावर तो नक्की बसेल.
अलिबाग तालुक्यातील बेलोशी गावात माणुसकीचा निखळ झरा खळखळताना पाहायला मिळाला.या गावातील एका कर्त्या पुरुषाला covid ची लागण झाली.त्यात त्या बिचाऱ्याचा दुर्दैवी अंत झाला.त्याच्या पश्चात मुलगा आणि पत्नी.त्या दोघांना सुद्धा विषाणू चे संक्रमण झाले होते.चिंतेची बाब म्हणजे पेरणीचा हंगाम सुरू,कुटुंबाची सारी दारोमदार शेतीवर…जर पेरलेच नाही तर उगवणार काय? या विवंचनेत हे कुटुंब असतानाच सारे ग्रामस्थ एकवटले आणि मदतीला धावून आले. ग्रामस्थ मंडळींनी सारे शेत नांगरून पेरणी करून दिली.
कोरोना रुपी कितीही संकटे आली तरी जो पर्यंत माणसामध्ये माणुसकी शिल्लक आहे तो पर्यंत आपले कुणीही वाकडे करणार नाही.
Be First to Comment