सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली तसेच ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचा 42 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे सर यांनी ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे लावलेले रोपटे आता वटवृक्षात रूपांतर झालं आहे. संस्थेची ही उत्तुंग भरारी अभिमानस्पद आहे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्तानं विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या.

याप्रसंगी प्रभाकर म्हात्रे विद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर, महादेव गावंड, मनोज गावंड, हरिश्चंद्र गावंड, महेश म्हात्रे व सविता ठाकूर हे पालकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक चिर्लेकर सर, सूत्रसंचालन केणी सर तर आभार प्रदर्शन एन. एस. पाटील सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यांनी विशेष मेहनत घेतली.












Be First to Comment