बकुळ फुला
बकुळ फुला,
नाही तुला रूप, नाही तुला रंग
भूल घाली परी तुझा मादक गंध
साधेपणा हाच तुझा अलंकार
तुझ्यापुढे फिका मोगऱ्याचा बहार
इवलासा देह तुझा, कांती फिकी तपकिरी
वेड लाविले तू मज, केलीस जादूगिरी
तुझ्या सुगंधाने मी धुंद होऊनि जाते
विसरूनी देहभान मी माझी नुरते
तुला नाही सखा, नाही कोणी आप्त
मी पण तुझ्यासारखीच, सगळ्यातून अलिप्त
सख्या, एक करशील का माझ्यासाठी?
सुगंधाचे अविट देणे देत राहा कायमसाठी
-पौर्णिमा दिक्षित, नवीन पनवेल






Be First to Comment