जन आक्रोशाची क्लिप वेगाने व्हायरल : प्रशासनाला गंभीर इशारा
सिटी बेल लाईव्ह/ डोंबिवली.
डोंबिवली रेल्वेस्थानकावर जनतेचा उद्रेक पाहायला मिळणारी क्लिप सध्या व्हायरल होत आहे.वातानुकूलित कक्षात बसून कागदावर नियमांच्या रेघोट्या मरणाऱ्यांनी या क्लिप करून अंदाज घ्यावा. हा जन आक्रोश ढळढळीतपणे एक संदेश देतोय, पाट्या टाकण्याची कामे पुरे झाली! आता कामाला लागा!
डोंबिवली रेल्वे स्थानकावर सकाळी झालेल्या प्रकरणातील जनआक्रोश बघितल्यावर पोलिस सुद्धा हतबल झाले. अगदी पालघरला साधूंना ठार मारले जात असताना जसे होते तसेच ते हतबल वाटले.
प्रशासनाचे एक मात्र बरे आहे, कोरोना निर्मूलनाची जबाबदारी जनतेवर ढकलायची! उपचारांसाठी जनतेच्याच खिशातून बक्कळ पैसा उकळायचा! गरजेपोटी बाहेर पडलेल्या दीनदुबळ्यांच्या अंगावर दंडुक्याने निर्दयीपणे फटके मारून खाकीची पोकळ मर्दुमकी दाखवायची! जनतेलाच बेड आणि औषधांसाठी वणवण फिरायला लावायचे! जनतेलाच अव्वाच्या सव्वा वीजबिले करायची! आणि वर जनतेसाठीच निर्णय घेत असल्याचा आव आणायचा!
वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ वरुन एकच सिद्ध होते की जनता आता उद्रेकाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे बा प्रशासना! आता तरी सावध होऊन प्रामाणिकपणे काम कर….
Be First to Comment