सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रोटरी व रोटरॕक्ट क्लब आॕफ पाताळगंगा यांच्यावतीने गणेश उत्सवात दिड दिवस,पाच दिवस,सात दिवस आणि अनंत चतुर्दशीपर्यंत असणाऱ्या रसायनी परिसरातील काही गणेश बाप्पांचे विसर्जन रिस येथील गणेश विसर्जन घाटावर करण्यात आले. विसर्जन स्थळी आलेल्या भाविकांकडून गणेश घाट परिसर अस्वच्छ होत असतो.यासाठी रोटरी व रोटरॕक्ट क्लब आॕफ पाताळगंगा यांनी निर्माल्य कुंड तयार करून या कुंडात निर्माल्य टाकावे व प्लास्टिक वेगळ्या पिशवीत ठेवून याचे संकलित करावे यासाठी रोटरी व रोटरॕक्ट आॕफ पाताळगंगा यांच्या स्वयंसेवकांनी आजूबाजूच्या परिसरात पडलेला प्लास्टिक कचरा संकलित करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली.

रायगड जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था निर्मल गणेशोत्सव साजरा करत आहेत. रोटरी व रोटरॕक्ट क्लब पाताळगंगा यांनी स्वच्छता व आरोग्य या दोन महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करून तसेच निर्माल्य नदीत टाकल्याने नदी पात्र प्रदूषित होते.नदीत राहणारे जीवांना धोका निर्माण होतो.व सर्वत्र दुर्गधी सुटते याचाच विचार करून रोटरी व रोटरॕक्ट क्लबने स्वयंसेवकांच्या सहकार्याने निर्माल्य व प्लास्टिक संकलन करून रिस गणेश घाट आसपासचा परिसर स्वच्छ व सुंदर सुरक्षित ठेवण्यासाठी सामाजिक भावनेने रोटरी व रोटरॕक्ट क्लब कार्य करत आहे.यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष गणेश काळे यांनी उपस्थित असणाऱ्या गणेश भक्तांना सूचना केल्या कि आजूबाजूला कचरा टाकू नये व कोरोनाचे नियम पाळून उत्सव साजरा करावा व रोगराई समुल नष्ट करण्यासाठी आपल्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी रोटरी क्लब पाताळगंगाचे अध्यक्ष गणेश काळे,माजी अध्यक्ष भोसले,रोटरीयन होनावळे सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.डी.गुंड, परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, रोटरीचे स्वयंसेवक,गणेश भक्त या कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी विसर्जन स्थळी रसायनी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.



Be First to Comment