सिटी बेल | मुरुड जंजिरा | अमूलकुमार जैन |
मुरुड व एकदरा परिसरातील दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन रविवारी मुरुडच्या समुद्रकिनारी मोठ्या संख्येत पार पडले होते. हजारोच्या संख्येने गणरायांच्या मूर्तीचे विसर्जन मुरुड व एकदरा खाडीत करण्यात आले होते. शाडूच्या माती बरोबरच काही जण प्लास्टर ऑफ पॅरिस च्या सुद्धा मुर्त्या बनवत असतात.प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या पाण्यात विरघळण्यात मोठा कालावधी लागतो.व अश्यावेळी मोठ्या मुर्त्या समुद्र किनारी येत असतात विसर्जित केलेल्या मुर्त्या पुन्हा . किनाऱ्याला आल्याने त्याचे पुन्हा विधिवत विसर्जन करण्यासाठी धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे योग्य नियोजन दरवर्षी केले जाते.यासाठी श्री सदस्य मोठी मेहनत घेऊन किनाऱ्याला आलेल्या मुर्त्या पुन्हा खोल समुद्रात विसर्जित करण्याची मोठी जबाबदारी पार पाडत असतात.
मुरुड समुद्र किनारी प्लास्टर ऑफ पॅरिसचे विसर्जन न झालेल्या गणपतींच्या मूर्ती सोमवारी सकाळी किनारी आढळून आल्या , मुरुड समुद्रकिनारी विसर्जित न झालेल्या सुमारे ६५ गणेश मूर्ती व एकदरा खाडीलगत सापडलेल्या ५ गणेश मूर्ती रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या मुरुड मधील सुमारे २५ श्री सदस्यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व विश्वस्थ सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एका नौकेत जमा करून त्या मूर्तींचे खोल समुद्रात पुनःविसर्जन केले तसेच तालुक्यातील मजगाव खाडीकिनारी विसर्जित न झालेल्या गणेश मूर्तींचे सायंकाळी पुनःविसर्जन करण्यात येणार असल्याचे श्री सदस्य सदानंद मुंबईकर यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे.
Be First to Comment