सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले गेलेल्या खारगाव ग्राम पंचायत हद्दीतील खारी येथील संकष्टी चतुर्थी निमित्ताने “साखर चौथी” सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताचे औचित्य साधून घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी सदिच्छा भेटी दरम्यान राज्य मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी बाप्पांच्या दर्शन घेण्यासाठी सदिच्छा धावती भेट घेत दर्शन घेतले.
खारी ग्रामस्थ मंडळ व साखर चौथ गणेशोत्सव मंडळ, तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेले दहा वर्षांपासून भाद्रपद महिन्यातील “गणेश चतुर्थी ” निमित्ताने पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे येणारे घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव अनंत चतुर्दशी पर्यंत मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या पहिल्याच संकष्टी चतुर्थीला सर्वत्र चाहूल लागते ती “‘साखर चौथी” च्या गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी ची जय्यत तयारी याच अनुषंगाने आज शुक्रवार रोजी सर्वत्र विघ्नहर्ता गणरायाचे मंगलमय व हर्षोल्लासित ,प्रसन्न वातावरणामध्ये गणराया गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले असून रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्य मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री ना.अदिती ताई तटकरे यांनी आजच्या दिवसाचे दिनविशेष म्हणून गावोगावी स्थानापन्न झालेले “साखर चौथी” च्या घरगुती पद्धतीने तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो.
याशुभ दिनाचे औचित्य साधत पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी खारी रोहा येथील हनुमान मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या गणराया गणपती बाप्पांचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन घेण्यासाठी सदिच्छा भेटी दरम्यान सन २०२१ – २०२२ करिता आमदारांच्या स्थानिक कार्यक्रम विकास अंतर्गत काजुवाडी येथील स्वयंभू श्री गणंनाथ शिवालय मंदिर सामाजिक सभागृह – ५ लाख रुपये तसेच तारेघर येथील ग्राम दैवत तारामती मातेच्या मंदिरासमोरील सामाजिक सभागृह ७.५ लाख रुपये बांधणे कामी चे मंजुरी पत्रक खारगाव ग्राम पंचायतीचे उपसरपंच नितीन मालुसरे,सतेज आपणकर,शैलेश खिरीट,अवधूत मातेरे, ग्रामस्थ मंडळ, खारी – तारेघर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले..
यावेळी बोलताना ना.अदिती ताई तटकरे यांनी खारगाव ग्रा.पंचायती हद्दीतील तरुण पिढीने अतिशय स्तुत्य असा उपक्रम हाती घेतला असून या माध्यमातून गावाचे सांस्कृतिक वारसा जोपासला जात असून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने विकासकामांना निश्चितच चालना मिळेल. तर कोकणचे भाग्यविधाते खा.सुनील तटकरे व कोकण स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी वेळोवेळी सामाजिक हिताच्या प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्रधान्य दिले आहे व भविष्यात देखील जिव्हाळ्याचे प्रश्न आम्ही निश्चितच प्राधान्याने सोडवू असे सांगतानाच खारगाव ग्रा.पंचयतीमधील विकासकामांसाठी यापुढेही आम्ही सदैव तत्पर असल्याचे सांगितले.
यासमयी त्यांच्या समवेत रोहा तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जयवंत मुंढे,तसेच खारी विभागातील गणेश भक्त,सामाजिक कार्यकर्ते,ग्रामस्थ मंडळ, महिला वर्ग उपस्थियांनी पक्ष श्रेष्ठींचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
Be First to Comment