Press "Enter" to skip to content

कृष्णा रेसीडेंसीमधील अनंत चतुर्दशीपर्यंत विराजमान झालेल्या गणरायाला भावपूर्ण निरोप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

कृष्णा रेसीडेंसीमधील दहा दिवस विराजमान झालेल्या गणरायाला अखेर भक्तिभावाने निरोप देण्यात आला. कृष्णा रेसिडेंसीमध्ये सलघ दोन वर्ष अनंत चतुर्दशी पर्यंत गणराय विराजमान झाले.यावेळी कोरोना पाश्र्वभूमीवर नियमांचे पालन करुन अगदी भक्तिभावाने येथील रहिवाश्यांनी गणरायाचे स्वागत करुन एकोप्याने सर्व धर्मीयांनी उत्साहात सण साजरा केला.

दहा दिवस मनोभावे पूजा केली अखेर लाडक्या बाप्पाला अनंत चतुर्दशीला सायंकाळी भक्तीभावाने निरोप देण्यात आला.यावेळी कृष्णा रेसिडेन्सी मधील सर्व रहिवासी उपस्थित होते.गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’या आरोळ्यांनी परिसर दणाणून निघाला.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोशल डिस्टेन्ससिंग ठेऊन 10 दिवस आरती आणि पूजा तसेच विविध कार्यक्रम राबविन्यात आले होते या सोसायटी मधे सर्व जाती धर्माचे लोक अगदी एका कुटुंबा प्रमाणे राहतात कोनताही सन उत्सव असो सर्व एकत्र येऊन साजरा करतात

कोरोनाचा प्रादुर्भाव नसता तर खुप आनंदाने आणि खुप मौज मस्ती मधे हा सन आम्ही साजरा केला असता असे येथील रहिवासी सांगत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.