Press "Enter" to skip to content

खांब विभागात दहा दिवसाचे बाप्पांना भावपुर्ण निरोप

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तीमय वातावरणात घरोघरी आगमन झालेल्या गणरायांचे अनंत चतुर्थीला दहाव्या दिवशी खांब विभागात मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करून भावपूर्ण निरोप देण्यात आला.

सध्याच्या कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर सर्वच सण -उत्सव साजरे करण्यासाठी शासकीय नियमांचे पालन करावे लागत असल्याने सण-उत्सव साजरे करताना जास्तीत जास्त साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. तर श्री गणेशोत्सव देखील अशाच पद्धतीने साजरा करण्यात आला. या विभागात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना शासकीय नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.तर आजच्या विसर्जनासाठी गणेश भक्तांनी कुठल्याही प्रकारची गर्दी न करता दुपारी दोन वाजल्यापासूनच सुरक्षित अंतर ठेऊन विसर्जनासाठी सुरुवात करण्यात आली ते सायंकाळ पर्यंत श्री गणरायांना विसर्जित करण्यात आले.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त साद घालून तसेच कोरोना महामारीचे विघ्न लवकरच ठळून जाऊ दे.असे बाप्पाला साकडे घालून सार्वजनिक तलाव,नदी याठिकाणी भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.