सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
आंबेवाडी येथील सार्वजनिक गणपतीचे दरवर्षा प्रमाणे खासदार सुनिल तटकरे यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांचे स्वागत आंबेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश महाबळे आणि सुशील ढवळे यांनी केले.
गेल्या ३४ वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव अंबर सावंत मंदिरा समोरील जागेत भव्य प्रमाणात गणेशाची स्थापना होत होती. दहा दिवस विविध कार्यक्रमांची मोठी मेजवानी असायची. परंतु गेल्या वर्षी कोरोनाने सर्वत्र आहाकार माजविला होता. त्यामुळे गणेशाची स्थापना अगदी साध्या पद्धतीने आणि शासनाचे नियम पाळून आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या सभागृहात करण्यात आली.
गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षीही गणपतीची स्थापना आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात करण्यात आली आहे. शासनाचे नियम पाळून अनेक भाविकांनी गणपतीचे दर्शन घेतले. खासदार सुनिल तटकरे यांनी प्रति वर्षा प्रमाणे या वर्षीही गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायत सरपंच सुरेश महाबळे, सुशील ढवळे, राकेश लोखंडे, निलेश महाबळे, शैलेश सानप, महेंद्र वाचकवडे, जगन्नाथ धनावडे, सतिश बने, समीर शिंदे, बंड्या रजिवले, कांतिलाल गांधी, गणेश वाचकवडे उपस्थित होते.
Be First to Comment