Press "Enter" to skip to content

खांब-कोलाड विभागात पाच दिवसाचे गणपतींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तीमय वातावरणात घरोघरी आगमन झालेल्या गणरायांचे पाचव्या दिवशी मोठ्या जल्लोषात व भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

अधून मधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी व कोरोना महामारीची पार्श्वभूमी आदीची तमा न बाळगता गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या अशाप्रकारचा जयघोष करीत खांब-कोलाड विभागातील तमाम गणेशभक्तानी आपल्या लाडक्या बाप्पांना भक्तीमय वातावरणात निरोप दिला.गणेश चतुर्थीच्या मोठ्या आनंददायी वातावरणात गणरायाची घरोघरी स्थापना केल्यानंतर दररोज मनोभावे पूजन, भजन, आरती, हरिपाठ, किर्तन, जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रमही सुरक्षित अंतर ठेऊन संपन्न करण्यात आले.

कोरोना महामारीचे शासकीय नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तर चार दिवसांचे विश्रांतीनंतर विसर्जनाचे पाचव्या दिवशी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी विराजमान झालेल्या बाप्पांना निरोप देण्यात आला.टाळ म्रुदंग वाजवित हरिनामाचे गजरात व नाचगाणे करीत सार्वजनिक तलाव, नद्या आदी ठिकाणी गणरायांचे विसर्जन करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.