Press "Enter" to skip to content

कोलाड खांब देवकान्हे विभागातील दीड दिवसाच्या गणरायांचे विसर्जन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

मुंबई-गोवा महामार्ग व परिसरातील असणाऱ्या कोलाड खांब देवकान्हे विभागातील ग्रामस्थांनी नजिक असलेल्या कुंडलिका,महिसदरा नदीत तसेच या परिसरातील तलाव या ठिकाणी दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन कोरोना संकटावर मात करत व सोशल डिस्टनचा पालन करत भक्तिमय वातावरणात या विभागातील बाप्पांना निरोप देण्यात आला.

मुंबई-गोवा महामार्गावरील लगत असणाऱ्या कोलाड-आंबेवाडी, वरसगाव, पुई,पुगाव,खांब,परिसरातील नडवली, तळवली तर्फे अष्टमी, चिल्हे , धानकान्हे, बाहे, देवकान्हे सह विभागातील अन्य आदिवासी वाड्यापाड्यांवरील सर्व गणेश भक्तांनी गणरायाला गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या आणि राज्यासह देशावर व संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना संसर्ग विषाणूचे संकट दूर कर अशी मनोभावे प्रार्थना करत गणरायांचे विसर्जन केले. तसेच पायी हळु हळु चाला । मुखाने गजानन बोला ।। अशा जयघोषात दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात व थाटामाटात निरोप देण्यात आला,तसेच भक्तांकडून एकच प्रार्थना करण्यात आली की येणारे सर्व संकट दूर कर सर्वांनी सुखी ठेव अशी गणरायाकडे पार्थना करण्यात आली.

गेली काही दिवस अधून मधून सुरू असलेल्या पावसामुळे नदीनाले व तलाव तुडुंब भरले आहेत परंतु श्री गणेशाची घरोघरी प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर पावसाचा ओघ ओसरला आणि भक्तगणांची चिंता दूर झाली आणि दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन भक्तिमय वातावरण करण्यात आले,

प्रसंगी यावेळी विसर्जन मिरवणुकीला परवानगी नसल्याने तसेच कोरोना संकटाचे व कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करत कोलाड खांब देवकान्हे विभागातील भाविकांनी गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोलाड विभागीय पोलिस यंत्रणेकडुन गावो गावी याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.