Press "Enter" to skip to content

100 वर्षाची परंपरा असलेला रायगड जिल्ह्यातील गोरेगाव मधील गणपती

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव मधील मनोहर गोविंद गोरेगावकर आणि बंधू यांच्या गणपतीला 100 वर्षाची परंपरा आहे, दरवर्षी वेग वेगळे थिम्स ठेऊन सजावट तयार केली जाते.

माजी आमदार द. मा. तळेगावकर यांचे जावई गोविंद दगडू गोरेगावकर ह्याचा नवसाचा गणपती आहे, या गणपतीला शंभर वर्ष झाली आहेत. एकत्र कुटुंब पध्द्ती असल्याने सध्या चौथी पिढी गणपतीची स्थापना करत आहे, आधी त्यांची मुल आता त्यांची नातवंड,पतवंड उत्साहाने सजावट करतात. गेल्यावर्षी कोल्हापूरची आंबाबाई साकारली होती. ह्यावर्षी पंढरपूर ची विठ्ठल रुक्मिणी साकारली आहे. सजावट ही नेहमी इकोफ्रेंडली असते, दरवर्षी वेग वेगळे थिम्स ठेऊन सजावट तयार केली जाते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.