Press "Enter" to skip to content

तयारी बाप्पाची

  तयारी बाप्पाची

बाप्पाच्या आगमनाची 
  तयारी जोरात सुरू झाली
  मरगळलेल्या सुस्त तन ,
  मनाला उभारी मिळाली..

  कोवीड मुळे जरी आलयं बंधन
 .पण गणराया येणार आहे घरी
  याचाच आहे सगळीकडे आनंद
  त्यासाठी काळजी घेतलेली बरी
   
    घरातील  मंडळी एकत्र आली
    मास्क बांधून , लागली कामाला
    उत्सवांचे महत्त्व समजावण्यास
    घेतली बच्चेकंपनी ही मदतीला ..

 गृहिणींनी घेतला प्रसादाचा मक्ता
 नेवैद्य करण्यास मिळाली सुबत्ता
 नानाविध पक्वाने ,पोषक रसपूर्ण
 प्रासादिक भोजनाची कायम महत्ता
  
  मोदकांचे विविध प्रकार , करु सेवन 
  हसत खेळत करू मनोभावे पूजा-अर्चा
  भक्तिभावाच्या प्रसादाने होते तृप्त मन
  नकोच गलबलाट ,हीच सगळीकडे चर्चा 
  
   दहा दिवसांच्या साग्रसंगीत सेवेने 
   घराघरात पसरेल आनंदाचा सुर
   दूर पळवतील संकट एका नजरेने
  पळून जाईल आपदा सारी दूर..दूर ..
   

वर्षा मेहेंदर्गे, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.