शिक्षक दिन
शाळा बंद ,शिक्षण चालू
शाळा नाय ,अभ्यास चालू
गुरुजी कसं सांगू तुमास्नी
कोरोनाचं संकट आलं अस्मानी।।१।।
मला शाळला यायचं व्हुतं
पाटीवरती लिहायच व्हुतं
बाईंचे गाणं ऐकायचं व्हुतं
मित्रासंग भांडायच बी व्हुतं।।२।।
मोबाईल नाय माझ्या कडं
तर नेट कुठलं असायला
बाप होता कमावणारा
आजारानं विळखा घातला।।३।।
आई जाती भांड्याला
धाकटं ठेवती सांभाळायला
भात लागतो रांधायला
तरी बी शाळा शिकायचीय मला।।४।।
गुरुजी गेले घरी थेट
मुलांची घेतली तिथेच भेट
ऐकून घेतल्या त्यांच्या कथा
डोळ्यात पाणी ,ऐकून व्यथा।।५।।
कंबर कसली बाईंनी
कठीण काळात हात देऊनी
दूर केले दुःख थोडे
अभ्यासाचे घेतले धडे।।,६।।
पोरास्नी बी हुरूप आला
मास्तर माझ्या घरी आला
बाईंचे वाटलं लई कौतुक
भागवली माझी शिकायची भूक।।७।।
झोपडी गल्लीत मास्तर गेले
पट टिकवायला चंग बांधले
पदरमोड करून वहीपेन आणले
भुकेलेल्याचे पोट भरवले।।८।।
म्हणूनच म्हणते
शिक्षक एक बहुमूल्य तत्व
देती अपूर्णत्वाला पूर्णत्व
आदर्शाचे प्रतिक बनती
पिढ्यानपिढ्या संस्कारित करिती।९।।
डाँ. सर्वपल्ली राधाकृष्णन
श्रेष्ठ हा राष्ट्रीय बहुमान
साजरा करुनी शिक्षक दिन
शिक्षकांचा राखती मान।।१०।।
सुषमा सतीश गोखले, नवीन पनवे.







Be First to Comment