Press "Enter" to skip to content

“आय तुजा उध्दव,पयला नंबर देशान” गीताचा लोकार्पण सोहळा

प्रा.एल.बी.पाटील लीखीत गिताचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

सिटी बेल | मुंबई |

उध्दव ठाकरेंच्या आघाडी सरकारने दोन वर्षांच्या राज्यकारभारात मिळविलेले यश, सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरेंची देशात झालेली निवड, कोरोनावर तारणहार म्हणून अमेरिकेने केलेला गौरव,सर्वधर्मीय सलोखा
इत्यादींवरचे हे नृत्य आणि गायनाने सजलेलं हे पहिले गाणं आहे.

रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी लिहिलेले गीत,पंडित गणेश बंडा,
यांनी गाऊन आणि रुद्राक्षचे नितीन पाटील यांच्या नृत्याने सजले आहे.

या गिताचा लोकार्पण सोहळा सह्याद्री मुंबई येथे संपन्न झाला.यावेळी खासदार बारणे,आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, संघर्ष समिती
अध्यक्ष बबनदादा पाटील, आर.सी.घरत, नगरसेवक गणेश कडू, रमाकांत म्हात्रे, संतोष पवार आदी
उपस्थिती होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.