Press "Enter" to skip to content

कविश्री – अरुण दत्ताराम म्हात्रे यांची “बासरी” ही कविता.

~~ बासरी ~~
(अष्टाक्षरी रचना.)

दूर वाजता पवरी
हलकेच गोड सूर
पडतात कानावर
मंत्रमुग्ध चराचर…

कानी ऐकता राधिका
वेणूधारीची मुरली
देहभान विसरूनी
होई कावरी-बावरी…

गाईगुरांना आवड
ऐकण्यां तीही आतुर
शांत राहुनी ऐकती
बासरी ती सुमधुर…

ओठांतील हवे सह
फिरता बोटे हाताची
सूर लहरी निघती
कमाल ही बासरीची…

©®कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे.
वरळी-मुंबई, मो.9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.