Press "Enter" to skip to content

रायगडच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली

कोरोना महामारी, चक्रीवादळ, महापूर, अतिवृष्टी यासारख्या संकटात निधी चौधरी यांनी बजावली होती चांगली कामगिरी

सिटी बेल | मुंबई |

काही दिवसांपूर्वीच राज्यातील १४ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या . त्यानंतर आता पुन्हा ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचाही समावेश आहे.

रायगड जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळ ,अतिवृष्टी आणि महापुरा सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत तसेच कोरोना महामारीत निधी चौधरी यांनी चांगली कामगिरी दाखवली होती.

निधी चौधरी यांची मुंबईला मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.त्यांच्या म्हणजेच रायगड जिल्हाधिकारीपदी महेंद्र कल्याणकर यांना नेमण्यात आले आहे.निधी चौधरी या १ जानेवारी २०२० पासून रायगडच्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होत्या.त्यांच्यासह ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त संजय मीणा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर तेथील जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांची नागपूरच्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून नेमले आहे. तसेच मंत्रालयातील जीएडी कनिष्ठ सचिव एम.बी.वरभुवन यांची ठाण्यातील अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

बीड जी.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची मुंबई महापालिकेच्या सह- आयुक्तपदावर बदली करण्यात आली आहे. तर संजय दैने यांना हिंगोली जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमण्यात आले आहे. तसेच बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.